Mahavikas Aaghadi l राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार असल्याचं वारंवार बोललं जात आहे. अशातच आता यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संजय राऊतांनी केली मोठी घोषणा :
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्याने त्याच खापर एकमेकांवर फोडलं जातंय. मात्र आता अवघ्या काही महिन्यांनी राज्यात महानगरपालिका निवडणूक होणार आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी फुटू शकते अशा चर्चा रंगल्या आहे.
मात्र यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यावेळी राऊतांनी ठाकरे गट महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, संजय राऊतांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
Mahavikas Aaghadi l आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार :
याप्रकरणी संजय राऊत म्हणाले, “मुंबई, पुणे, ठाण्यासह नागपूरपर्यंत आम्ही महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवू, निवडणुकीत आमचं काय होईल, हे आम्हाला देखील एकदा आजमावायचं आहे”, अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे.
तसेच महाविकास आघाडीमध्ये काम करताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक कार्यकर्त्यांना संधी देता येत नाही. मात्र याचा फटका पक्षाच्या वाढीला नक्कीच बसला आहे. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढवणार आहोत, तसेच आपापले पक्ष मजबूत करणार आहोत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
News Title : Sanjay raut statement on mahavikas aaghadi
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! वाल्मिक कराडचा मुलगाही अडचणीत, बंदुकीचा धाक दाखवून…
देशभर जाळं असलेल्या ‘या’ मल्टीस्टेटवर ED ची कारवाई
प्रवाशांसाठी गुड न्यूज! लालपरीचं LIVE लोकेशन आता कळणार थेट मोबाईलवर
सरपंच हत्येपूर्वी वाल्मिक कराडने घुलेसोबत…; आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर
धक्कादायक!पिस्तूल साफ करताना स्वतःवरच झाडली गोळी, आमदाराचा जागीच मृत्यू