संजय राऊतांनी सैफच्या हल्ल्याच मोदींशी कनेक्शन जोडलं, म्हणाले….

Saif Ali Khan

Saif Ali Khan l बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरात मध्यरात्री चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. यावेळी घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. मात्र सध्या सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र याप्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत काय म्हणाले? :

खासदार संजय राऊत म्हणाले की, “सैफ अली खानवर रात्रीच्या सुमारास चाकू हल्ला झाला. मात्र तो मोठा कलाकार आहे. अशातच काल पंतप्रधान मुंबईत होते, त्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था मोदींच्या दौऱ्यात असणार. तसेच पंतप्रधान मुंबईत असले, तरी या राज्यात नेमकं काय चाललं आहे, हा प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वत:ला विचारला पाहिजे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

याशिवाय “आम्ही भाष्य केलं की गृहमंत्र्यांना यातना होतात. परंतु, महाराष्ट्रात सामान्य जनतेला सुरक्षा नाहीये, तसेच घरात, झोपडी, चाळीत कुठेही चोर-दरोडेखोर घुसत बिनधास्त वावरत आहेत” अशा शब्दात राऊतांनी राज्य सरकारचा समाचार घेतला आहे.

Saif Ali Khan l सैफ अली खानच्या हल्ल्यावर राऊतांना शंका :

दरम्यान, “सैफ अली खानला स्वत:ला सुरक्षा व्यवस्था असूनही तिथे चोर घुसतात आणि हल्ला करतात हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना धक्का आहे. कारण गेल्या 15 दिवसांपूर्वी सैफ अली खानने सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. तसेच मोदींनी त्यांच्या कुटुंबासोबत एक तास देखील घालवलेला आहे, त्यानंतर सैफ अली खानवर हल्ला होत आहे, तसेच तो चोराने केला की अन्य कोणी?”, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

“सध्या राज्यात कोणी सुरक्षित नाही, तसेच महिलांना रस्त्यावर फिरणं देखील मुश्किल झालं आहे. त्यामुळे हे गृहमंत्र्यांनी समजून घ्यावं. याशिवाय राज्यातील 90 टक्के पोलीस फुटलेले आमदार, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख यांच्या संरक्षणासाठी दिले जात आहेत. मात्र इथे सामान्य माणसाला सुरक्षा नाहीये, पण गद्दार, बेईमान आणि भ्रष्टाचाऱ्यांना सुरक्षा नसल्याचं”, संजय राऊत म्हणाले आहे.

News Title : Sanjay Raut Statement On Saif Ali Khan Attacked

महत्वाच्या बातम्या-

सैफ अली खानच्या मोलकरणीच्या जबाबामधून धक्कादायक माहिती समोर

मानेवर 10 सेमीची जखम, पाठीत धारदार शस्त्र खुपसलं; सैफच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई, चार जणांना ताब्यात घेतलं

सैफवर हल्ला झाला त्या रात्री करीना पार्टीत…; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

‘स्टेप बाय स्टेप सर्व प्रकरणं…’; वाल्मिक कराडच्या पत्नीचा सुरेश धस, बजरंग सोनवणेंना इशारा

 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .