“ठाकरे आहात तर ठाकरेंसारखं वागा, दिल्लीचे बूट चाटू..”; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

Sanjay Raut | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वीच विक्रोळीमध्ये एक सभा झाली होती. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासाठी एक रिकामी खुर्ची सभेत ठेवण्यात आली होती. यावरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut)

विक्रोळीमध्ये महाविकास आघाडीचे सुनील राऊत यांच्या प्रचार सभेत संजय राऊत बोलत होते. “एका सभेत माझ्यासाठी रिकामी खुर्ची ठेवली होती. मला याचे कारणच समजले नाही. मी म्हटले, आपली सभा आहे आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया. कारण, 23 ला आपण खाट टाकणारच आहे.तुमची खुर्ची आमच्यासाठी आणि आमची खाट तुमच्यासाठी.”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

आम्ही आमचा इमान विकला नाही, असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली. आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाहीत. आम्ही आमचा इमान विकला नाही. तुम्हाला आम्ही महाराष्ट्रातून संपवून टाकू, असा इशारा देखील राऊत (Sanjay Raut) यांनी दिलाय.

पुढे ते म्हणाले की,” राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांना मी आमंत्रण देतो अधूनमधून तुम्ही इथे येत राहा. इथे तुमच्या खाटा टाकायचे काम आमचे शिवसैनिक करतील. एकदिवस तुमची त्या खाटेवरून राजकीय अंत्ययात्रा काढू. तुम्हाला राज्यातून संपवूनच टाकू”, असंही राऊत म्हणाले आहेत.

“राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू”

पुढे राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. “नरेंद्र मोदी यांनी हा महाराष्ट्र भिकारी केला, त्यांचे आपण पाय चाटता. ते ठाकरे आहेत आणि आम्ही राऊत आहोत, तेही बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले राऊत आहोत. ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा, दिल्लीचे बूट चाटू नका.”,असा टोलाही राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांना लगावला.

News Title :  Sanjay Raut strongly criticizes Raj Thackeray

महत्वाच्या बातम्या –

“मुस्लिमांचे तळवे चाटतायेत, त्यांना खुश केलं जातंय आणि कातडी हिंदूंची सोलली जातेय”

‘मनोज जरांगे राक्षस…’; कालीचरण महाराजांची दातओठ खात सणसणीत टीका

धक्कादायक! अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार

शेकोट्या पेटल्या, राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार?; IMD चा महत्वाचा अंदाज

“या नेत्यानी मुलाच्या लग्नाचा खर्च सरकारी तिजोरीतून केला” ठाकरेंच्या आरोपावर प्रतिउत्तर