मुंबई | औरंगाबादबाबत शिवसेनेची भूमिका सर्व पक्षांना माहिती आहे. जे नामांतराला विरोध करतात त्या पक्षांना का भाजप विचारत नाही? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारलाय.
भाजप पक्षाला काय प्रॉब्लेम आहे. औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार केला, त्यावर केंद्र अजूनही निर्णय घेत नाही. भाजप नेते त्यावर का बोलत नाहीत, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा संभाजीनगरला काही विरोध असेल असं वाटत नाही. त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला नव्हता. ते समजूतदार नेते आहेत, आम्ही त्यांच्याशी चर्चा करु, असंही संजय राऊत म्हणाले.
लसीवर कोणत्याही पक्षाचा हक्क नसतो. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे सुपर मॅन आहेत. भाजपची लस न घेण्याबाबत ते मस्करीत बोलले असतील, असंही संजय राऊत म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘…तर महाराष्ट्राचंही नामांतर करा’; या नेत्याची राज्य सरकारकडे मागणी
‘ही तर टाटा, बिर्लांची सेना’; आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सौरव गांगुलीला फोन, म्हणाले…
शिवबंधन सोडत ‘या’ शिवसेना नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!
शिवसैनिकांनो…सध्या मोर्चाची गरज नाही- संजय राऊत