Top News

अजित पवारांचं काय?; खासदार संजय राऊत म्हणतात…

मुंबई | 80 तासांचे सरकार ज्यांनी फडणवीस यांच्याबरोबर स्थापन केले ते अजित पवार काय करतील? भाजपच्या सर्व आशा आजही फक्त अजित पवारांवरच टिकून आहेत. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात अजित पवारांची काय भूमिका असेल याबाबत शरद पवारांना विचारलं असता त्यांनी काळजी नसावी असं सांगितलं असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

अजित पवारांची चिंता करू नका. हे सरकार पाच वर्षे तेच टिकवतील. निश्चिंत राहा! शरद पवार निश्चिंत आहेत तोपर्यंत सरकार स्थिर आहे. महाराष्ट्र निश्चिंत आहे. हे सरकार टिकवायचेच या एका निर्धाराने शरद पवार उभे आहेत. काळजी नसावी! असं शरद पवार विश्वासाने म्हणाले आहेत, असं संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

मुख्यमंत्री आणि 6 मंत्री मिळून राज्याचा कारभार सुरू आहे. नागपूर अधिवेशनानंतर संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. भाजप आणि शिवसेनेत 25-30 वर्षे नव्हता त्यापेक्षा उत्तम संवाद सरकारमधील तीन पक्षांत दिसत आहे. आघाडीचे सरकार चालवणे ही एक कला आहे आणि असे सरकार चालवणाऱ्या प्रमुख नेत्यांकडे मनाची दिलदारी असावी लागते, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे ही दिलदारी मला पहिल्या दिवसापासून दिसत आहे. अडवणुकीचे आणि ओरबाडण्याचे धोरण दिसत नाही हे महत्त्वाचं, असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या