बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुख यांच्यावर धाड, ‘दया कुछ तो गडबड हैं’ म्हणत राऊतांकडून शंकेची वावटळ!

मुंबई | सीबीआयनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. या संपूर्ण कारवाईवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहेत.

कुछ तो गडबड है. मा. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा, असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर धाडी, एफआयआर वगैरे हा अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय आणि तर्कसंगत दिसत नाही. कुछ तो गडबड जरुर है, असं म्हणत संजय राऊत यांनी या संपूर्ण कारवाईवरच शंका घेतली आहे.

सीबीआयचा एक अजेंडा आहे. कोर्टाची ऑर्डर आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईवर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नाही, असं संजय राऊत म्हणाले होते.  देशमुखांनी त्यांचं म्हणणं सीबीआयकडे मांडलं आहे. सीबीआयचा प्राथमिक रिपोर्ट कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचं ते पाहू. सीबीआय त्यांचं काम करत आहे. कोर्टाने आपलं काम केलं आहे. महाविकास आघाडी सरकारही आपलं काम करत आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना 100 कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप करून परमबीर सिंग यांनी खळबळ उडवून दिली होती. यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशीचे आदेश दिले, पण सीबीआयने धाडच टाकली”

आठवड्याभरातच कोरोनामुक्त झाला सोनू सूद, कंगणा म्हणाली…

‘रोज उठून त्यांचं नाटक चाललंय’; चंद्रकांत पाटील संजय राऊतांवर भडकले

कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी मंत्र्यांच्या पोरांचं ‘एक पाऊल पुढे!’

न्या. एन. व्ही. रमणा भारताचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली शपथ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More