बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद सोपवलं”

मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडलं. तसेच अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र पवारांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. आता या प्रकरणावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून भाष्य केलं आहे.

देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळालं. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिलं. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असं राऊतांनी म्हटलंय.

अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावं. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणं आणि चौकशांचे जाहीर आदेश देणं बरं नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असं वर्तन गृहमंत्र्यांचं असायला हवं. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल? असा सवालही राऊतांनी रोखठोकमधून केला आहे.

गृहमंत्र्यांनी वाझेंना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग करतात. त्या आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आले नाही! सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसले, असं संजय राऊत म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

‘आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली’; दिपाली यांचं पतीला लिहिलेलं भावनिक पत्र व्हायरल

जीवाभावाच्या मित्राची दगडाने ठेचून केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

…तर आम्ही रश्मी शुक्ला यांच्यासोबत आहोत- प्रणिती शिंदे

‘हा’ कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे- देवेंद्र फडणवीस

फोन टॅपिंगप्रकरणी एकनाथ खडसेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More