बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कडवट शिवसैनिक दुसरं काहीही करेल पण बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही”

मुंबई | सचिन वाझेंनीही एक लेटरबॉम्ब टाकला आहे. वाझे यांनी या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांनी NIA कोर्टात हे पत्र दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रात शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा उल्लेख असल्याचे समोर आलं आहे. मात्र अनिल परब यांनी वाझेंनी केलेले सर्व फेटाळले आहेत.

अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत वाझेंनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आणि माझ्या दोन्ही मुलींची शपथ घेऊन मी सांगतो की हे खोट आहे. मला बदनाम करण्यासाठी केलेले आरोप आहेत, असं अनिल परब म्हणाले. या प्रकरणावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंत्री अनिल परब यांची पाठराखण केली आहे. कडवट आणि खरा शिवसैनिक दुसरं काहीही करेल पण तो बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ कधीची घेणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

विरोधक हे सरकारमधील मंत्र्यांचे चारित्र्यहनन करायचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी लॉकअपमधील आरोपींकडून काही गोष्टी वदवून घेतल्या जात आहेत. अनिल परब यांच्यावर आरोप करणारा पत्रलेखक सध्या एनआआयएच्या ताब्यात आहे. हा पत्रलेखक संत किंवा महात्मा आहे का, यावर भाजपनं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. मात्र, जेलमध्ये आणखी काही व्यक्ती आहेत. त्यादेखील पत्र लिहू शकतात, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

थोडक्यात बातम्या- 

मित्रांनी आपल्याच मित्रावर केला हल्ला; बेदम मारहाणीमुळे 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

कामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे- हसन मुश्रीफ

“आतापर्यंत मी गप्प राहिलो, पण माझं मौन हे कुणी माझी कमजोरी समजू नये”

उदयनराजे म्हणतात, ‘सध्या राज्यात काय राजकारण चाललंय हे मलाच कळेना’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More