बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अर्णब गोस्वामीविरुद्ध हक्कभंग आणून खळबळ माजवणारे सरनाईक हतबल का झाले?”

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रावर आणि सध्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या कारवाई रोखठोक भूमिका मांडली आहे.

सरनाईक यांनी एक पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलं आणि राजकारणात खळबळ उडवली. सरनाईक हे शिवसेनेचे आमदार. मुख्यमंत्री शिवसेनेचे. तरीही त्यांनी हे पत्र लिहिलं. सरनाईक यांना सुरुवातीला ‘ईडी’चे समन्स आले तेव्हा भाजप व ईडीच्या अन्यायाशी शेवटपर्यंत लढेन असे त्यांनी सांगितलं. अर्णब गोस्वामीविरुद्ध हक्कभंग आणून खळबळ माजवणारे सरनाईक असे हतबल का झाले? आमदार सरनाईक यांचा त्रागा मुख्यमंत्र्यांना असं टोकाचं पत्र लिहिण्यापर्यंत का गेला? माझ्याबरोबर माझ्या कुटुंबियांचाही छळ सुरू आहे, तो थांबवा हे त्यांचं म्हणणं, असं असं राऊत यांनी सांगितलं.

आज श्रीमंत राजकारणी, उद्योगपती ‘ईडी’,‘सीबीआय’समोर नांगी टाकतात. सत्ताधारी पक्ष विरोधकांवर दबाव आणण्यासाठी अशा यंत्रणांचाच वापर करतो. भाजपशी  जुळवून घेतल्यावरही सरनाईक सारख्यांचा त्रास कमी होईल याची खात्री काय? केंद्रीय तपास यंत्रणांकडे अशी कोणती जडीबुटी आहे, की नोंदवलेले गुन्हे सहज पुसता येतील व सुरू केलेला तपास थांबवता येईल, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात व इतरत्र मात्र आमदारांना विनाकारण त्रास देणं सुरूच आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी झाली. त्यात महत्त्वाचा ठराव कोणता? तर अजित पवार व अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा आणि त्यासाठी आधार काय? तर जो अधिकारी आरोपी असून अटकेत आहे त्याने बेछूट आरोप केलेले पत्र. आरोपी म्हणून अटकेत असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्राच्या आधारावर सीबीआय चौकशीची मागणी कशी केली जाऊ शकते,? असा सवालही राऊतांनी उपस्थितीत केला.

थोडक्यात बातम्या- 

रिझर्व्ह बँकेचा राजकारण्यांना झटका; घेतला हा मोठा निर्णय

संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?- प्रविण दरेकर

“30 विषाणूंपासून भविष्यात मानवाला धोका, त्यांच्यापासून मोठी साथ पसरू शकते”

“ओबीसींच्या आरक्षणासाठी मंत्रिपदाला लाथ मारण्याचा दम आहे का?”

आज पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’; सकाळी 11 वाजता देशाला संबोधित करणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More