बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी कुणालाही भेटलो नाही, अफवांनी राजकारण हलत नाही- संजय राऊत

मुंबई | भाजप नेते आशिष शेलार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली अशी बातमी शनिवारी माध्यमांमध्ये पसरली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचंही समोर आलं होतं. या बातमीवर आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मी काल कुणालाही भेटलो नाही. या सर्व अफवा आहेत. अशा अफवांनी राजकारण हलत नाही. अफवा पसरवण्याचे कारखाने सुरू आहेत. ते दिवाळखोरीत निघतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

काही दिवसांपूर्वी आशिष शेलारांना एका कार्यक्रमात भेटलो होतो. वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांना भेटतो, राजकारण म्हणजे हिंदूस्तान आणि पाकिस्तान नाही. त्यामुळे राजकारणात भेटीगाठी होत असतात, असं संजय राऊत म्हणाले.

विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिलं पाहिजे. गोंधळ करणं म्हणजे रणनीती नाही. माझ्या बोलण्यानं, लिहिण्यानं त्रास झाला म्हणून अफवा पसरवल्या जातात. जनतेचे विषय मांडा, सभागृहात चर्चा करा. जेवढ्या अफवा पसरवाल तेवढं आम्ही मजबूत होऊ, माझ्यामुळे अडचणी निर्माण होणारे अशा अफवा पसरवत आहेत, असा टोला संजय राऊतांनी विरोधकांना लगावलाय.

थोडक्यात बातम्या- 

‘गोपीचंद पडळकरांचं अंग माणसाचं आणि तोंड डुकराचं’; ‘या’ नेत्याची जीभ घसरली

कोरोनापेक्षा डेल्टा व्हेरियंटची लक्षणं वेगळी; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे?; अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ ‘या’ व्यक्तीलाही इडीकडून समन्स!

लसीकरण प्रमाणपत्रानंतर गरिबांना पुरवण्यात येणाऱ्या ‘रेशन’वरही मोदींचा फोटो!

‘कोरोनाचे डेल्टासारखे व्हेरिएंट…’; WHO च्या प्रमुखांनी दिली अत्यंत महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More