बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशातील हर एक चौथा मुसलमान भिकारी आहे , ही माहिती अस्वस्थ करणारी”

मुंबई | देशातील हर चौथा भिकारी मुसलमान असल्याची माहिती अस्वस्थ करणारी आहे. साधारण चार लाख भिकाऱ्यातील 25 टक्के मुसलमान आहेत. मुसलमान भिकाऱ्यांत महिलांची संख्या जास्त आहे. त्यामागची कारणे तिहेरी तलाक पद्धतीत होती. तो तिहेरी तलाक आता कायद्याने बंद केला, हे महत्त्वाचं, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरात म्हटलंय. राऊतांनी आजचं रोखठोक भिकारी या विषयावर लिहित केंद्र सरकारला फटकारलं आहे.

भारतासारख्या देशात गरिबी आणि भिकाऱ्यांची पैदाइश का होत आहे? गेल्या पन्नास वर्षांपासून प्रत्येक सरकार ‘गरिबी हटाव’चे नारे देत निवडणुका लढवत आहे. मोदी यांनी तर गरिबी निर्मुलनासाठी प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 15 लाख टाकून घराघरांत सोन्याचा धूर काढण्याचीच घोषणा केली होती. ‘गरिबी हटाव’ची खिल्ली उडवत ‘अच्छे दिन आयेंगे’चा ऊर्जावान नारा देऊनही आज देशभरात गरिबी व भिकारी आहे, अशी टीका त्यांनी केली.

एकेकाळचा धनाढ्य विजय मल्ल्या यास कोर्टाने दिवाळखोर जाहीर केले. म्हणून तोसुद्धा कंगाल आणि भिकारीच झाला. मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांच्या बाबतीत तेच म्हणायला हवे. देशात श्रीमंत भिकाऱ्यांचीच संख्या वाढते आहे. हजारो कोटींची सरकारी कर्जे बुडवून हे श्रीमंत स्वतःस दिवाळखोर म्हणून जाहीर करतात व पुन्हा त्याच श्रीमंती तोऱ्यात जगतात. या भिकाऱ्यांचं काय करायचं? हा प्रश्नच आहे, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, देशात भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि हा एक सामाजिक विषय म्हणून पाहायला हवा, असं मतही संजय राऊत यांनी रोखठोकमधून व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला”

महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; झिका विषाणूचा पहिला रूग्ण आढळला ‘या’ शहरात

…वेळ आली तर सेनाभवन फोडू- प्रसाद लाड

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर; नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने नाराज असलेल्या बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला अलविदा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More