“राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टकमक टोकावरून फेकून द्यावं”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

रायगड | शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना टकमक टोकावरून फेकून द्यावं, असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावर जाऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान करूनही त्यांना पाठिशी घातलं जातंय. मात्र महाराष्ट्र या अपमानानंतर शांत बसणार नाही, असा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती शिवरायांचा एवढा अपमान होऊनही भाजप साधी माफी मागायला तयार नाही. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. त्यांच्यावर भाजपने कारवाई केली. गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र छत्रपती शिवरायांचा घोर अपमान होऊनही काहीही कारवाई नाही, असं सांगत राऊतांनी भाजपवर टीका केली आहे.

उदयनराजे यांनी केलेली मागणी ही महाराष्ट्राची भावना आहे. साडेतीनशे वर्षांपासून टकमक टोकाचा वापर झाला नाहीये. या निमित्ताने तो व्हावा, असंही राऊत म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe