बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भास्कर जाधवांच्या दमदाटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

मुंबई | पावसामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत असलेले शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी महिलेसोबत गैरवर्तन केलं. यानंतर या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यावरून विरोधकांनी शिवसेनेवर सडकून टीका केलीये.

भाजपकडून भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली जात आहे. आता या प्रकरणावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर जाधवांबाबत मी पाहिलं नाही फक्त वृत्त पत्रांमध्ये वाचलं. त्यामुळे या सगळ्यावर तेच बोलतील, असं म्हणत संजय राऊतांनी या विषयावर जास्त बोलणं टाळलं.

अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणं गरजेचं आहे. लोकांचा आक्रोश वेदना समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि मुख्यमंत्री आणि सरकार हे करतं आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांसमोर महिलेवर हात उगारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भास्कर जाधवांना एवढा माज कसला? असा प्रश्न उपस्थित करत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणाऱ्या महिलेवर हात उगारून भास्कर जाधवांना काय दाखवून द्यायचं आहे?, असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

पूरग्रस्तांसाठी विजय वडेट्टीवार यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

सांगलीत कृष्णेचा रूद्रावतार ; 1 लाख 96 हजार 957 नागरिकांचं स्थलांतर

काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचं निधन!

PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे येणार

भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकन फलंदाज फेल; टी-20 सामन्यात भारताचा दमदार विजय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More