महाराष्ट्र मुंबई

“शब्द पाळला नाही तर काय होतं याचा अनुभव भाजपनं महाराष्ट्रात घेतलाय, त्यामुळे…”

मुंबई | भाजप नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपद देईल. कारण शब्द पाळला नाही तर काय उलथापालथ होऊ शकते, हे महाराष्ट्राने भाजपला दाखवून दिलं आहे. त्यामुळे भाजप नितीश कुमार यांना दिलेला शब्द फिरवणार नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

बिहारचा निकाल काही लागला तरी ‘मॅन ऑफ द मॅच’ हे तेजस्वी यादव हेच असतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते  मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

भाजपची केंद्रीय यंत्रणा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊनही अवघ्या 30 वर्षांच्या तेजस्वी यादव यांनी सगळ्यांच्या तोंडाला फेस आणला, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

संयुक्त जनता दलाच्या कमी जागा येऊनही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तर त्यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेला बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!

“नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव यशस्वी”

मुंबई पोलिसांच्या समन्सानंतरही मुंबईत हजर राहण्यास कंगणाचा नकार, म्हणाली…

“मंगळावर जाणारे सॅटेलाइट नियंत्रित होऊ शकतात तर ईव्हीएम मशीन का हॅक होऊ शकत नाही?”

“एनडीए आघाडीवर दिसत असली तरी येत्या काही तासांमध्ये हे चित्र पुन्हा पालटू शकतं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या