बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा”

नंदूरबार | शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो. हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.

चंद्रकांत पाटलांचा काल वाढदिवस होता. त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेऊ नका, असं म्हणत राऊतांनी चंद्रकांत पाटलांनी खिल्ली उडवली आहे. ते नंदूरबारमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध भाष्य करत भाजपवर सडकून टीका केली आहे.

संजय राऊतांनी यावेळी बोलताना प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया दिली. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. एखादा सर्व्हे करण्यासाठी किंवा एखाद्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते पवारांना भेटले असतील. त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

दरम्यान, मी म्हटलं आम्ही मैत्री करण्याचा कायम प्रयत्न करतो. पण आम्ही जंगलातील वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आम्ही मैत्री कामय होती. पण आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ घालाय, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तासभर खलबतं; भेटीत काय झालं अजित पवारांनी सांगितलं!

‘काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…’; सर्वोच्च न्यायालयाचा परमबीर सिंगांना झटका

अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही, भेटीसाठी घरी येऊ नका- राज ठाकरे

रेल्वे रुळावर बाईक स्टंट करायला गेला अन् अचानक ट्रेन आली, पाहा व्हिडीओ

ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More