बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता…’; संजय राऊतांचा भाजपला इशारा

मुंबई | भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. हुतात्मा चौक जसं आपल्या अस्मितेचं प्रतिक आहे. मराठी माणसाचं केंद्रबिंदू आहे. तुमचे राजकीय मतभेद असू शकतात. पण तसंच शिवसेना भवन मराठी माणसाच्या अस्मितेचं भवन आहे. ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू आहे. शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचं कारण काय?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा राऊतांनी भाजपला दिलाय.

तुम्हाला लिहिता वाचता येतं का? तुमचा शिक्षणाशी काही गंध आहे का? तुम्ही सामनाचा अग्रलेख नीट वाचा. जे आरोप झाले ते नीट वाचा. आमचे प्रवक्ते काय म्हणाले ते नीट ऐका. जे आरोप झाले आहेत, त्याची चौकशी करावी. ते आरोप द्वेष बुद्धिने केले असतील तर आरोप करणाऱ्यांना सोडू नका. त्यांच्यावर कारवाई करा, असं अग्रलेखात म्हटलं आहे. त्यावरून तुम्हाला मिरच्या का झोंबल्या?, असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या- 

…तर आपल्याला तिसऱ्या लाटेलाही सामोरं जावं लागेल- उद्धव ठाकरे

लपत छपत येत महिलेवर हात उचलण्यात कसला आलाय पुरूषार्थ?- चित्रा वाघ

उद्धव ठाकरेंचं सरकार हे गुंड सरकार- किरीट सोमम्या

मनसुख हिरेन प्रकरणात नवं वळण; एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचा छापा

“…तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More