बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बॉलिवूडमधील दिग्गज दडपशाहीविरोधात गप्प का आहेत?- संजय राऊत

मुंबई | दिग्दर्शक अनुराग काश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या कार्यालयावर धाडी मारण्यात आल्या आहेत. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात जेव्हा जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली तेव्हा तेव्हा सिने उद्योगातील लोकांनी सर्वात आधी आवाज उठवला आहे. परंतु आज देशात दडपशाही सुरू असताना बॉलिवूडमधील दिग्गज गप्प का आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

तुमच्याकडे काही माहिती असेल तर जरूर धाडी टाका. कारवाई करा. तपास करण्याचा तुम्हाला अधिकारच आहे. पण सरकार विरोधात बोललं म्हणून धाड टाकणं गैर आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा दिला म्हणून कलाकारांवर धाडी टाकणं, जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला म्हणून धाडी टाकणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोललं म्हणून कलाकारांवर धाडी टाकणं योग्य नाही, असं म्हणत राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दडपशाहीविरोधात आवाज उठवणं केवळ तापसी पन्नू किंवा अनुराग काश्यप यांचं काम नाही. तुमच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही आवाज उठवलाच पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलू नये म्हणून दडपण आणलं जात आहे. गप्प राहण्यास सांगितलं जात आहे, त्यामुळे या विरोधात बॉलिवूडने आवाज उठवला पाहिजे. प्रादेशिक इंडस्ट्रीनेही त्यावर बोललं पाहिजे, असंही राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

कॉमेडी किंग जॉनी लिव्हरचा मुलांसोबतचा व्हिडिओ व्हायरल, पाहा व्हिडिओ

18 नाही तर आता ‘इतक्या’ वर्षापर्यंत करावा लागणार मुलाचा सांभाळ; सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय

फारुख अब्दुल्लांच्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हिडिओ

“श्रीराम बोले मै कहाँ बडा, मै तो बीजेपी के मॅनिफेस्टो मे पडा”

खाता खाता धाडकन पडला चिमुरडा, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More