बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचं प्रदर्शन करावं”

मुंबई | राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पूर आला असून सातारा, सांगलीमध्येही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरामुळे शेतकऱ्यांचं प्रचड नुकसान झालं आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला विनंती केली आहे.

लोकांनी आपली घरे, व्यवसाय, संसार, कपडे-धान्य गमावलं आहे. त्यांना सहस्र हातांनी मदत व्हायला हवी. राज्य सरकार मदत करतच आहे, पण खास करून आपल्या प्रिय दिल्लीश्वरांनी यावेळी आपल्या दिलदारीचं प्रदर्शन करावं, अशी विनंती शिवसेनेनं अग्रलेखातून केलीये.

संबंधित मंत्री, पालकमंत्री, अधिकारी यांना सूचना देताना दिसत होते. तरीही ‘मुख्यमंत्री लगेच का पोहोचले नाहीत?’ असा पोरकट प्रश्न विचारणारे काही लोक स्वतःचेच हसे करून घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता आपत्तीग्रस्त भागात पोहोचलेच आहेत, पण आधी मदत पोहोचणे गरजेचे होते. दुर्घटनास्थळी पोहोचून फोटोचे कार्यक्रम उरकणं याला संवेदना किंवा पुनर्वसन म्हणता येत नाही, असं म्हणत शिवसेेनेनं अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधला आहे.

कोल्हापूर, सांगलीत पूरपरिस्थितीने चिंता निर्माण केली आहे. अर्ध कोकण दरडग्रस्त आणि जमीनदोस्त झाल्याचं चित्र विदारक आहे. महाराष्ट्रातील 15 जिल्हय़ांना महाप्रलयाचा जबरदस्त फटका बसला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, जळगाव, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नगर, अमरावती, भंडारा, रत्नागिरी, रायगड आणि मुंबईतील काही भागांवर पावसाने कोप केला आहे. या सर्व संकटांतून बाहेर पडण्यासाठी राज्याला हजारो हातांचे बळ लागेल, असं अग्रलेखात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

भविष्यात कोरोनाचे आणखी व्हेरिएंट येण्याची शक्यता, त्यामुळे…- डॉ. रणदीप गुलेरिया

मुख्यमंत्री आज सातारा दौऱ्यावर; पुरग्रस्त भागाची पाहणी करणार

काही सेकंदातच लोखंडी पूल उद्ध्वस्त झाला; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर

“भास्कर जाधव हे तमाशातील सोगांड्या आणि दशावतारातील शंकासूरच”

“राज्य चालवता येत नसेल तर केंद्राला देऊन टाका, आम्ही वेटिंगवरच आहोत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More