“देवेंद्र फडणवीस यांचं अंतरंग वेदनेनं धडधडतंय”

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच आम्ही लढू, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या या वक्तव्यची संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे.

फडणवीस अपमान सहन करून उपमुख्यमंत्री झाले आहेत. ते बोलतात एक. पण त्यांच्या अंतरंगात वेदना आहे. त्यांच्या जवळच्या लोकांना माहीत आहे. आम्ही त्यांच्या जवळचे आहोत. त्यांचं अंतरंग धकधकतंय नुसतं, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

पत्रकार परिषद घेत असताना बारसूमधील रिफायनरी प्रकल्पाबाबत देखील भाष्य केलं. यावेळी त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर ही जोरदार टीका केली. हवा बहोत तेज चल रही है, टोपी उड जायेगा, आम्हाला शहाणपणा शिकवू नका, असा इशाराच संजय राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिला. 

कोणता तरी सरकारी कागद फडकवत उदय सामंत यांनी शहाणपणा करू नये. नाणारला जावं आणि लोकांशी बोलावं, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-