बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोकांना कधीकधी वाटतं, अजून यौवनात मी, अजूनही मी मुख्यमंत्री”

मुंबई | मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. गेले दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधी जनतेने हे जाणवू दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाही. मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं फडणवीसांनी म्हटलं होतं. आता त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर आता संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. लोकांना कधीकधी वाटतं, अजून यौवनात मी असं एक नाटक रंगमचावर गाजलं आहे. तसंच काहींना वाटतं की, अजून यौवनात मी, अजूनही मी मुख्यमंत्री. तसंच दिल्लीत गेल्यावरही आम्हाला कधीकधी वाटतं की आमचाच पंतप्रधान आहे, अशी खोचक टीका राऊतांनी केली आहे.

लोकांना स्वप्न पहायला आवडतात. त्यांची भावना योग्य आहे. त्यांच्या स्वप्नांनाही यश यावं आणि आकाशात उडण्यासाठी बळ यावं. अशा शुभेच्छा देत संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.

दरम्यान, मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय, फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद-विवाद होताना दिसत आहे. त्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून खोचक टीकाटिप्पणी सुरू आहे.

थोडक्यात बातम्या – 

“फडणवीस मुख्यमंत्री असताना खुट्ट झालं तरी बोंबाबोंब व्हायची”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंचा पुन्हा आक्रमक पवित्रा

देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत चढ-उतार सुरूच, वाचा आकडेवारी

संजय राऊतांचा बैठकींचा सपाटा; पुण्यात मोर्चेबांधणीला केली सुरूवात

या भाजपच्या नेत्यांवरील आरोपाचं पुढे काय झालं? राष्ट्रवादीचा पोस्टर्समधून किरीट सोमय्यांना सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More