“ईडी, सीबीआय बाजूला ठेवून या, काडतूस कुठं घुसतं ते दाखवतो”

मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तुम्हाला फडतूस म्हटलं आहे. तुम्ही स्वत:ला काय काडतूस म्हणता. तुम्ही तर भिजलेले काडतूस आहात. तुमचं खरं काडतूस कुठलं असेल तर सीबीआय आणि ईडी आहे. म्हणून तुमची मस्ती आणि चरबी आहे. ही ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवून या. मग काडतूस कुठं घुसतं ते आम्ही दाखवतो, असं आव्हानच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलं आहे.

महाराष्ट्रात एक परंपरा आहे आणि संस्कृती आहे. ही त्यांनी मोडीत काढली आहे, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (Bjp) केली आहे.

तुम्ही झुकलेला आहात. वाकलेला आहेत. ज्याला दोन शब्द नीट वाचता येत नाही. बोलता येत नाही. त्यांच्या नेतृत्वात मी काम करतो असं अभिमानाने म्हणतात त्याला झुकणं नाही म्हणत का? असा सवाल करतानाच मिस्टर फडणवीस तुम्ही झुकेच आहात, अशी टीकाही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

दरम्यान, राऊतांनी यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील सडकून टीका केली. तुम्ही काय लूट केली होती वीज खात्यात हे जर आम्ही बोलायला गेलो ना जरा कठीण होईल तुमचं, असा इशारा राऊतांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या-