महाराष्ट्र मुंबई

“लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये जातात; आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच मरणार”

मुंबई | लपवाछपवी घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, मात्र आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.

मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असा इशाराही राऊतांनी दिला. ते मंबईत माध्यमांशी बोलत होते.

सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करु शकत नाही, भले कायद्यावर कोणाचाही दबाव असला, तरी आम्ही कायदे मानतो. कायद्यांचं पालन करतो. मी अद्याप ईडीची नोटीस पाहिली नाही, त्याची मला गरजही वाटत नाही, पण तिचं उत्तर देणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

हे राजकारण कसं सुरु आहे, ते मला माहिती आहे, ते चालू द्या, मला त्यात पडायचं नाही, असं राऊतांनी स्पष्ट केलं. भाजपच्या त्या तीन नेत्यांबद्दल विचारलं असता हळूहळू त्यांची माहिती देणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांनो काळजी घ्या; ब्रिटनहून आलेले 109 प्रवाशी बेपत्ता!

“प्रकाश आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाशी काही संबंध राहीला नाही”

वर्षा संजय राऊत यांचं ईडीला पत्र; केली ‘ही’ मागणी

“अरुण जेटली असते तर शेतकरी आंदोलनावर तोडगा निघाला असता”

खळबळजनक! विधान परिषद उपसभापतींची आत्महत्या, रेल्वे रुळावर सापडला मृतदेह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या