महाराष्ट्र मुंबई

मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल तो…- संजय राऊत

मुंबई | मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिला आहे. ते मंबईत माध्यमांशी बोलत होते.

लपवाछपवी घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, मात्र आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

ईडीची मला कीव येते, कारण अशा सरकारी संस्थांना एके काळी प्रतिष्ठा होती, तरीही सत्यमेव जयतेचा शिक्का असलेल्या सरकारी कागदपत्रांचा मी आदर करत राहीन, असं संजय राऊत म्हणाले.

हे राजकारण कसं सुरु आहे, ते मला माहिती आहे, ते चालू द्या, मला त्यात पडायचं नाही, असं राऊतांनी स्पष्ट केलं. भाजपच्या त्या तीन नेत्यांबद्दल विचारलं असता हळूहळू त्यांची माहिती देणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात शिरकाव, 6 जण नव्या विषाणूमुळे बाधित

“लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये जातात; आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच मरणार”

पुणेकरांनो काळजी घ्या; ब्रिटनहून आलेले 109 प्रवाशी बेपत्ता!

“प्रकाश आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाशी काही संबंध राहीला नाही”

वर्षा संजय राऊत यांचं ईडीला पत्र; केली ‘ही’ मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या