महाराष्ट्र मुंबई

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले…

मुंबई | भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून 23 तारखेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनीही खडसेंचं महाविकास आघाडीत स्वागत केलं आहे. उनकी कुंडली जम गई होगी, असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणालेत.

आयुष्याच्या या वळणावर, एकनाथ खडसेंनी भरल्या डोळ्यांनी भाजपाला रामराम केला. गेल्या 40 वर्षे भाजपसाठी काम करणारे खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे खडसेंच्या या निर्णयामागे नक्कीच मोठं कारण असणार, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. खडसे 23 तारखेला शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

अजित पवारांना कोरोनाची लक्षणं, क्वारंटाइन होण्याचा घेतला निर्णय!

“एकनाथ खडसेंचं ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली”

पोलीस कॉन्स्टेबल मारहाण प्रकरणी मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाचा मोठा दिलासा!

मनसे नेते अमित ठाकरे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या