“सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोंड शिवून बसलेत”

मुंबई | उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहिले. ते महाराजांचे वंशज आहेत. उदयनराजेंचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू आहे. महाराजांचा अपमान करण्यापेक्षा मरण का नाही आलं?, असं म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय.

सरकार वाचवण्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चुप्पी साधली आहे. त्यामुळेच त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला नाही, असा घणाघाती हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने शिवाजी महाराजांचा अवमान केला. ते त्यांच्या जागी बसले. तुम्ही त्यांचं समर्थन करत आहात. अशा मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार आहे का?, असा सवाल त्यांनी केलाय.

उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहिले. ते महाराजांचे वंशज आहेत. उदयनराजेंचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू आहे. महाराजांचा अपमान करण्यापेक्षा मरण का नाही आलं?, ही प्रत्येक मराठी माणसांच्या मनातही भावना आहे, असं राऊत म्हणालेत.

उदयनराजेंनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केली. पण मुख्यमंत्री आणि सरकार एका हतबलतेने पाहतंय आणि परत शिवप्रताप दिन साजरा करतंय, हे ढोंग आहे, असा घणाघातही केलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More