“जेलमध्ये जायचं नाही असं म्हणत एकनाथ शिंदे माझ्याही घरी येऊन रडले होते”

मुंबई | युवासेना प्रमुख आदित्य ठाक (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी जेलमध्ये जाण्याच्या भीतीने बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केली, असा मोठा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

भाजपमध्ये(Bjp) गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. तसेच एकनाथ शिंदे त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवास्थानी येऊन अक्षरश: रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या दाव्यामुळे एकच खळबळ उडालीये.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आता आदित्य ठाकरे यांचा हा दावा खरा असल्याचं म्हटलंय. तसेच एकनाथ शिंदे यांचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं आहे, अशी टीकाही त्यांनी केलीये.

एकनाथ शिंदे माझ्याकडेही आले होते. आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती करत होते. मला अटकेची भीती वाटतेय असं म्हणत होते, असा गौप्यस्फोट करतानाच एकनाथ शिंदे यांचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-