संजय राऊत एक्झिट पोलवर भडकले, म्हणाले…

Sanjay Raut | शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्झिट पोलची खिल्ली उडवली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल हा दोन दिवसांवर आला आहे. त्याआधीच एक्झिट पोलने आपले काही अंदाज ठरवले आहेत. मात्र आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्झिट पोलचीच खिल्ली उडवली आहे. चॅनलने मतदान केले नाही किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्याने मतदान केले नाही. एक्झिट पोलचे आकडे ठरवले आहेत. राजस्थानमध्ये 26 जागा आहेत. परंतु एका एक्झिट पोलने भारतीय जनता पक्षाला 33 जागा मिळतील, असं दाखवलं आहे.

“एक्झिटपोलवाले भारतीय जनता पक्षाला 800 ते 900 जागा देतील”

यावेळी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला आणि एक्झिट पोलला एक उपहासात्मक टोला लगावला आहे. एक्झिटपोलवाले भारतीय जनता पक्षाला 800 ते 900 जागा देतील, असं राऊत यांनी वक्तव्य केलं आहे, आज राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. तसेच राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यानावर वक्तव्य केलं.

नरेंद्र मोदींच्या ध्यानावर राऊतांचं भाष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीत 45 तास ध्यान केले. ते ध्यानाला बसले होते तेव्हा कॅमेरे लावले होते. त्यामुळे भाजपला 360-370 जागा मिळणार नाही. त्यांनी केलेल्या ध्यानामुळे किमान 800 मिळाल्या पाहिजेत तर ते ध्यान मार्गी लागले आहे. ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षात चुकीचे ठरत आहेत. भाजप देशाचे गृहमंत्री आणि यंत्रणा राबवून ते करुन घेत आहे, असे राऊत यांनी म्हटले.

इंडिया आघाडीचे सरकार देशात येणार आहे. इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे. लोकांडून मिळालेला हा कौल आहे. सध्या मोठे मोठे जे पक्ष आहेत, जे सत्तेवर आहेत, ते पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणत आहेत, असा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

गेल्या दहा वर्षातील एक्झिट पोल म्हणजे पैसा फेको तमाशा देखो त्यामुळे आमचा त्यावर विश्वास नाही. आम्ही त्यावर बोलणार नाही. असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच त्यांनी राज्यात एकूण 35 जागा या महाविकास आघाडीला मिळणार असल्याचं म्हटलं.

दरम्यान यावेळी त्यांनी बारामती लोकसभेवर देखील भाष्य केलं आहे ते म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे या दीड लाख मतांनी विजयी होणार आहे. शिवसेनेचा 18 चा आकडा कायम राहील तसेच काँग्रेसला बेस्ट परफॉर्मन्स होणार आहे.

News Title – Sanjay Raut Talk About Exit Poll

महत्त्वाच्या बातम्या

‘आपल्याकडे आयुष्यात दोन…’; ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरची पोस्ट व्हायरल

बीडची जागा कोण जिंकणार?; एक्झिट पोल्सचा आश्चर्यकारक अंदाज

पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीस्वाराला उडवलं; पुढं जे झालं ते..

अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार; वाचा एक्झिट पोलचा अंदाज

पुण्याची जागा कोण जिंकणार?, सर्वच्या सर्व एक्झिट पोलमध्ये आलं एकच नाव