Top News

कुणी कितीही चिखलफेक केली तरी आमचं सरकार पाच वर्ष टिकणार, कारण…- संजय राऊत

मुंबई | शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात अगदी 50 जणांच्या उपस्थितीत पार पडत आहे. यावेळी कुणी कितीही चिखलफेक केली तरी आमचं सरकार पाच वर्ष टिकणार, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.

11 कोटी जनतेचे आशीर्वाद या सरकारच्या मागे आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना, वादळ आणि इतर संकटाला तोंड देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डगमगले नाहीत. चिखलफेक झाली तरी ते राज्याचा कारभार करत आहेत, असं राऊत यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात ज्या पद्धतीने राज्याचा गाडा हाकला त्याची नोंद इतिहासात नक्की होईल, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना आणि पेंग्विन महासरकार हे दोन व्हायरस…- अमृता फडणवीस

“आपल्याला मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचं आहे”

…तर माझी अवस्था देखील आडवाणी आणि वाजयपेयींसारखी झाली असती- एकनाथ खडसे

‘या’ अपेक्षेने मी सत्ताधारी पक्षात सामील झालो- एकनाथ खडसे

पंकजा मुंडे संपल्या असं वाटणाऱ्यांनी ही जनसंपत्ती पाहावी- पंकजा मुंडे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या