बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई | अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळालं. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी अनिल देशमुखांकडे दिलं, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी ‘सामना’च्या रोखठोकमधून परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांवर भाष्य करत महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. गृहमंत्र्यांनी वाझेंना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग करतात. त्या आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आलं नाही, असं म्हणत राऊतांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

गृहमंत्री या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असं रोखठोक मत राऊतांनी व्यक्त केलं आहे.

अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावं. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणं आणि चौकशांचे जाहीर आदेश देणं बरं नाही, असा टोलाही राऊतांनी देशमुखांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

फडणवीस साहेब फार मोठे नेते आहेत, मी त्यांच्यापुढे छोटा आहे- सचिन सावंत

गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावं, ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणं हे बरं नाही- संजय राऊत

“…म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद सोपवलं”

‘आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली’; दिपाली यांचं पतीला लिहिलेलं भावनिक पत्र व्हायरल

जीवाभावाच्या मित्राची दगडाने ठेचून केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More