बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“प्रियांका गांधींमध्ये माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक दिसते”

मुंबई | काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. या घटनेवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनामधील आपल्या रोखठोक सदरात स्पष्ट भूमिका मांडली आहे.

प्रियंका गांधी यांनी दिलेल्या लढ्याला यश आलं आणि यानिमित्ताने त्यांच्यामध्ये देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची झलक दिसली, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारलं. ईडी, सीबीआयसारख्या तपासयंत्रणा कुणालाही अटका करीत आहेत. पण चार खून पचवून जगातला सर्वांत मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला आहे. त्याची झोप उडवण्याचे काम प्रियांका गांधी यांनी केलं. इंदिराजींचे अस्तित्व यानिमित्ताने पुन्हा दिसलं. प्रियांका गांधींमध्ये थेट भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक दिसते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, इंदिरा गांधींच्या नातीला, राजीव गांधींच्या कन्येला भररात्री पोलिसांशी संघर्ष करताना देशाने पाहिलं. प्रियांका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला, त्यांना इंदिरा गांधींचे देशात अस्तित्व आहे आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल, असंही संजय राऊत म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

सुखद धक्का! मुलाच्या चुकीमुळे बाप झाला करोडपती

‘राहुलजी तो दिवस लवकर उजाडो’; संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट

‘नेकी कर दरिया में डाल’ हा देवेंद्र फडणवीस यांचा चांगला गुण- अमृता फडणवीस

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी आरोग्य मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

अजित पवारांवरील कारवाईवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More