बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर मी कंगणाची माफी मागण्याचा विचार करेन- संजय राऊत

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगणा राणावतची माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जर कंगणाने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी तिची माफी मागण्याचा विचार करेन, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.

तिने मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटलं. हेच अहमदाबादबद्दल बोलायची तिच्यात हिंमत आहे का?, असा सवाल संजय राऊतांनी यावेळी केला. संजय राऊतांनी कंगणावर ‘हरामखोर’ अशी टिप्पणी केल्यानंतर अभिनेत्री दिया मिर्झा, दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्विट करत ते वक्तव्य योग्य नसल्याचं म्हटलंय. दिया मिर्झाने राऊतांनी कंगणाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

कंगणाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. तिच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात मास्क न घालणाऱ्यांवर मोठी कारवाई; आतापर्यंत इतका दंड वसूल!

…तर भारतीय अमेरिकन नागरिकांचे मत आम्हाला मिळेल- डोनाल्ड ट्रम्प

सुशांतसिंग प्रकरणात मोठी कारवाई; आता ‘या’ व्यक्तीला केलं अटक

अभिनेता रजनीकांत यांनी घेतली महागडी लेम्बोर्गिनी उरूस, किंमत ऐकून थक्क व्हाल…!

मी कुणाच्याही दबावाला जुमानत नाही; पिंपरी-चिंचवडमध्ये कृष्ण प्रकाश यांची ‘दबंग’ एन्ट्री!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More