मुंबई | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे वकील आज आक्रमकपणे बाजू मांडण्याची शक्यता आहे. यावर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता सर्वोच्च न्यायालय हा आशेचा शेवटचा किरण उलाय आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टात तूर्तास पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. यात नबाम रेबिया प्रकरणानुसार पुढील सुनावणी व्हावी का याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह बहाल केलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीये. या याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टासमोर केली.
सरन्यायाधीशांनी मात्र याचिकेवर तात्काळ सुनावणीस नकार दिला आणि आज हे प्रकरण मेन्शन करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे आज सत्तासंघर्षाची सुनावणी आधी होते की ठाकरेंच्या याचिकेवर कोर्ट आधी सुनावणी घेतं हे पाहावं लागणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून आव्हान दिलं जाण्याची शक्यता गृहित धरून शिंदे गटाने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलंय. आमचं म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये अशी विनंती शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाला केलीये.
महत्त्वाच्या बातम्या-
- आता काय बोलाव! ‘ही’ कंपनी तुम्हाला देतीय गांजा फुकायचे 88 लाख
- आदिलविरोधात लढण्यासाठी राखीला ‘या’ पक्षाचा पाठिंबा
- मोठी बातमी! विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाकडे
- ”लोकसंख्या नियंत्रण कायदा येईपर्यंत प्रत्येक सनातनी कुटुंबाने 5 ते 6 मुलांना जन्म द्यावा”
- “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे नसते तर शिवाजी महाराजांची ओळख तितक्या मोठ्या प्रमाणात देशभर नसती”