बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपने संपूर्ण ताकद लावली तरी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल”

मुंबई | देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणूका होत आहे. यापैकी सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमध्येे आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यावर शिवसेना नेता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. यावेळी  ममता बॅनर्जी सहज विजयी होतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे. तसेच देशातील चार राज्यांच्या निवडणुका या राजकारणाच्या भविष्याची दिशा ठरवणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

या देशात नेहमीच लोकशाहीवर हल्ले होत आले आहेत, ही पहिली वेळ नाही. याविरोधात जनता, विरोधी पक्ष लढले आहेत, म्हणूनच लोकशाही जिवंत आहे. ममता बॅनर्जी यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं असून आम्ही त्यावर विचार करु, असं राऊत म्हणाले. तसेच केरळ आणि तामिळनाडूत काय होईल याचा अंदाज आपण मांडू शकतो. पण आसाममध्ये माझ्या माहितीप्रमाणे भाजपचं राज्य असलं तरी काँग्रेस तगडी फाईट देत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. केरळ, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू या राज्यासंह 2 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

थोडक्यात बातम्या- 

कोहलीच अव्वल! एकदिवसीय सामन्यात विराटची रँकिंग नंबर 1

‘मी बोरिस जॉन्सन यांच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध ठेवलेत’; ब्रिटनच्या पंतप्रधानांबाबत महिलेचा मोठा गौप्यस्फोट

‘हा केवळ अर्थमंत्र्यांचा प्रॉब्लेम आहे, की…’; सुब्रमण्यम स्वामी मोदी सरकारवर बरसले

बेड मिळत नसल्याने ॲाक्सिजन सिलेंडरसह आंदोलन केलेल्या रुग्णांचा मृत्यू

सह्याद्रीतील नव्या वनस्पतीला शरद पवार यांचे नाव!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More