बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच पडली पाहिजे”

मुंबई | राज्य सरकार मराठा आरक्षणप्रश्नी हात झटकत नाही. हात झटकत आहे ते केंद्र सरकार. त्यामुळेच मराठा आरक्षणप्रश्नी दिल्ली दरवाजावर हत्तीची टक्कर देणं आवश्यक आहे आणि ही धडकच निर्णायक ठरेल, असं मत शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त केलं आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याप्रमाणे माहौल निर्माण करावा लागेल. मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच पडणं गरजेचं आहे, असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन राजभवनात पोहोचले. राज्यपालांना निवेदन दिलं व मराठा आरक्षणाचा तिढा केंद्राने लवकरात लवकर सोडवावा, असं हात जोडून सांगितलं. राज्यपाल हे केंद्राचे राज्यदूत आहेत. मराठा आरक्षणाबाबत ते भूमिका पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना कळवतील. म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रयत्नांची शर्थ केली तरी आता पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपतींनाचा अंतिम निर्णय घ्यायचा आहे, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या हातात टोलवला आहे. मराठा आरक्षणाची हुकूमी पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पानं टाकावीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

‘परमबीर सिंग यांच्या इशाऱ्याने वाझेकडून खंडणी वसुली’; कार डिझायनरच्या पत्राने खळबळ

‘फेसबुक लाईव्ह म्हणजे नुसत्या कोरड्या गप्पा’; मुख्यमंत्र्याच्या भाषणावर भाजपने विचारले हे ‘6’ प्रश्न

एका मृत्यूचा मुद्दा बनवला जातोय, लसीचे दोन डोस घेऊन मेलेल्या अनेक डॉक्टरांचं काय?- बाबा रामदेव

‘तुमचा मनसैनिक खचलाय, आता याला तुम्हीच उत्तर द्या’; मनसे पदाधिकाऱ्याची राज ठाकरेंकडे मागणी

ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More