“काय झाडी.., काय डोंगार.., काय हाटेल….. मग महाराष्ट्र काय स्मशान आहे का?”
मुंबई | शिवसेना नेते आणि बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला धक्का आणि धोका देत आपल्या गटातील आमदारांसह अगोदर सुरत आणि नंतर आसामच्या गुवाहाटी येथे पोबारा केला. तिथून ते महाराष्ट्रातील राजकीय खेळी खेळू लागले. वेळोवेळी समाज माध्यमे आणि पत्रकारांमार्फत आपल्या मागण्या आणि प्रतिक्रिया महाराष्ट्रात पोहचवू लागले. हे सर्व आमदार गुवाहाटीमधील रेडीसन ब्लू हॉटेलात थांबले आहेत.
सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना त्यांच्या एका कार्यकर्त्याने फोन करुन कुठे असल्याची चौकशी केली असता, त्यांनी आपण आसाम येथे आहोत असे म्हंटले. तसेच आपल्या नाराजीचे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचे देखील सांगितले. अजित पवार सुडाने वागत असून ते आपल्याला विचारत नाहीत असे सांगितले. अडीच वर्षात काॅंग्रेेसने आणि राष्ट्रवादीने आपले कोणतेच काम केले नाही, असेही ते म्हणाले. पुढे हॉटेलचे वर्णन सांगताना, काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, सर्व ओकेमध्ये आहे असे म्हणाले. ही क्लीप सगळीकडे व्हायरल होत असून आमदारांच्या चाललेल्या चैनीची सगळीकडे चर्चा आहे.
या वर्णनाला प्रत्यत्तर देत सेना खासदार संजय राऊत यांनी आमदारांना टोला दिला. राऊत म्हणाले, कोण्या एका आमदाराने म्हंटले आहे, काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, मग महाराष्ट्रात काय समशान आहे का?
राऊत पुढे म्हणाले, ज्या हॉटेलात हे बंडखोर आमदार उतरले आहेत तिथे फोन करुन आम्ही कार्यक्रमासाठी 40 खोल्या मागितल्या. परंतु, अजून त्यांचे काही उत्तर आले नाही.
थोडक्यात बातम्या –
संजय राऊतांकडून बंडखोर आमदारांचा डुक्कर असा उल्लेख, म्हणाले…
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
‘यावर्षी योग्य माणसाच्या हस्तेच विठ्ठलाची पूजा’; भाजप खासदाराचं सूचक वक्तव्य
मोठी बातमी! राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार?
एकनाथ शिंदे दारुच्या नशेत?; ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
Comments are closed.