मुंबई | देशात जो प्रकाश पडलाय तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच (Narendra Modi). मोदी हेच सूर्य, मोदी हेच चंद्र, धुमकेतूही मोदीच आहेत. शीतल चांगणं मोदींमुळेच पडतं. नद्यांचं वाहणं, समुद्राचा खळखळाटही मोदींमुळेच होतो, माझा श्वास चालतो, तोदेखील मोदींमुळेच, अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपहासात्माक टीका केलीये.
नवी दिल्लीत राऊत यांनी भ्रष्टाचाराचा विषय लावून धरला. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.
मोदी हे सूर्य आहेत, चंद्र आहेत. धुमकेतू आहेत. पण त्यांनी गेल्या काही काळात निरमा वॉशिंग पावडरचं उत्पादन सुरु केलंय. भाजप धुलाई यंत्र सुरु केलंय. त्याच्यावर बोला. मोदी आणि त्यांची यंत्रणा केंद्रापासून राज्यापर्यंत भ्रष्टाचाराला कवचकुंडलं म्हणून वापरते. गौदम अडानी, नीरव मोदी, विजय माल्या, किरीट सोमय्या यांना कोण संरक्षण देतंय..याच्यावर फडणवीस यांनी बोलावं, असा आव्हान संजय राऊत यांनी दिलं.
इथे सगळंच मोदी करतात, मग भ्रष्टाचाराला या देशात संरक्षण का दिलं जातंय? गैरव्यवहार करणाऱ्यांना भाजपची कवचकुंडलं का आहेत, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या-