बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत संजय राऊतांचा गौप्यस्फोट, म्हणाले..

मुंबई | मुंबईच्या हॉटेलमध्ये दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. आता याप्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून प्रश्न उपस्थित केले आहेत. एक हिंमतबाज लढवय्या नेता अशी ओळख असताना डेलकरांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे. लोकसभेत तरी डेलकरांना न्याय मिळेल काय?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांनी देशभरात खळबळ माजवली त्या प्रत्येकासाठी डेलकरांची आत्महत्या हे आव्हान आहे. मोहन डेलकरांची आत्महत्या हे साधे प्रकरण वाटत नाही, असं राऊत म्हणाले.

सिल्वासा हा केंद्रशासित प्रदेश. येथे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपेक्षा केंद्राने नेमलेल्या प्रशासकांचंच जास्त चालतं. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा सतत संघर्ष सुरूच असतो. पुन्हा निवडून आलेले खासदार हे दिल्लीतील सत्ताधारी पक्षाचे नसतील तर त्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीस पिळवणुकीच्या चरकातून जावे लागते, रोज अपमानित व्हावे लागते. त्याची प्रचंड कोंडी होत असते. गेली काही वर्षे डेलकर याच पिळवणुकीच्या चरकातून जात होते, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.

सुशांत राजपूतने त्याच्या एका सिनेमात आत्महत्या करू नये. निराश होऊ नये, असे संवाद फेकले. त्यामुळे सुशांतसारखा खंबीर मनाचा तरुण आत्महत्या कसा करील? सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याची ‘पटकथा’ तयार झाली. त्या कथाकारांना डेलकरांच्या आत्महत्येमागे कोणतेच काळेबेरे दिसू नये? डेलकर यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली, स्वतःचा अत्यंत दारुण शेवट त्यांनी करून घेतला याबद्दल किती जण हळहळले?, असा सवाल करत संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली; मनसेनं सांगितली अंदर की बात

गजा मारणेनंतर पोलिसांची नजर आता पुण्यातील ‘या’ खतरनाक टोळीवर!

आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना राजेश टोपेंनी दिला हा कानमंत्र; म्हणाले…

‘तो एकटा निघाला…’, अमोल कोल्हेंनी शरद पवारांवर लिहिली ‘ही’ खास कविता

धक्कादायक! राज्यात कोरोनाचा वाढता आलेख, जाणून घ्या आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More