बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नटाचा मृत्यू झाल्यावर खळबळ माजते पण सात वेळा खासदार झालेला माणूस जातो तेव्हा सगळे शांत”

मुंबई | खासदार मोहन डेलकर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. आता याप्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून प्रश्न उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला आहे.

मोहन डेलकर हे हिंमतबाज होते, ते पळपुटे नव्हते. ते आत्महत्या का करतील? त्यांना जय-पराजयाची चिंता कधीच वाटली नाही. अशा डेलकरांचा मृतदेह मुंबईतील हॉटेलात फासावर लटकलेला आढळतो आणि सगळे चूप आहेत. एका नटाची आत्महत्या खळबळ माजवते, एका नटीचे बेकायदेशीर बांधकाम तोडल्यावर हलकल्लोळ होतो, पण सातवेळा निवडून आलेले एक खासदार मुंबईत संशयास्पदरीत्या मृत पावतात त्यावर कोणी काहीच आपटायला तयार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांनी देशभरात खळबळ माजवली त्या प्रत्येकासाठी डेलकरांची आत्महत्या हे आव्हान आहे. मोहन डेलकरांची आत्महत्या हे साधे प्रकरण वाटत नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

लोकसभेत खासदार डेलकर यांना दोन मिनिटांची श्रद्धांजली वाहिली जाईल. पण तेवढय़ाने काय होणार? डेलकरांच्या आत्महत्येच्या चौकशीसाठी संपूर्ण सभागृहात आवाज उठवायला हवा, असं राऊतांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

गॅस, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली ‘चूल मांडा’ आंदोलन करणार

मोठी बातमी! खासगी रुग्णालयांमध्ये ‘इतक्या’ रुपयांत मिळेल कोरोनावरील लस

मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत संजय राऊतांचा गौप्यस्फोट, म्हणाले..

…म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली; मनसेनं सांगितली अंदर की बात

गजा मारणेनंतर पोलिसांची नजर आता पुण्यातील ‘या’ खतरनाक टोळीवर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More