“…तर पंतप्रधान असताना मोदींनी काय केलं?”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शिर्डीत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. केंद्रात कृषीमंत्री असताना शरद पवार (Sharad Pawar) यांना शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल केला. आता आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) प्रश्न विचारण्यात आला आहे. ‘पंतप्रधान असताना काय केले?’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्रात येणं-जाणं वाढलं आहे. यात चुकीचं काहीच नाही. लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भाजपसाठी कमजोर राज्य आहे. त्यामुळे मोदींचं महाराष्ट्रावर जास्त लक्ष आहे. मोदी गुरुवारी शिर्डीत आले व नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील 14 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची भूमिपूजने झाली. यावर श्री. प्रकाश आंबेडकर यांचं भाष्य अत्यंत मार्मिक आहे. गावच्या सरपंचाचा हट्ट असतो. गावातील प्रत्येक कामाचे उद्घाटन त्याच्याच हस्ते व्हावे. प्रत्येक कामाचे श्रेय त्यालाच मिळावे. मोदी हे त्या सरपंचाच्या भूमिकेत आहेत. त्याला कोणी काय करायचे? श्री. प्रकाश आंबेडकरांचे हे म्हणणे खरेच आहे, असं अग्रलेखात राऊतांनी म्हटलंय.

अनेक प्रतिष्ठत लोक, व्यापारी या देशात राहणे नको म्हणून वैतागून दुसऱ्या देशात पलायन करीत आहेत. हा देश राहण्यालायक ठेवला नाही. लोक भयग्रस्त आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुणांना निराशेने ग्रासले आहे. पंतप्रधान असताना मोदींनी काय केलं?, असा सवाल अग्रलेखातून करण्यात आलाय.

‘यूपीए’ सरकारच्या काळात पवार दहा वर्षे कृषिमंत्री होते. पंजाबराव देशमुखांनंतर लाभलेले पवार हे सर्वोत्तम कृषीमंत्री होते व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी उत्तम योजना राबवल्या. त्यात आता पडायचे नाही, पण मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत जे देशाला दिले त्यांनी काय केले? त्यांना शेतीतले किती कळत होते?, असं सांगत अग्रलेखातून सरकारवर निशाणा साधण्यात आलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .