महाराष्ट्र मुंबई

“संजय राऊत हे नेलकटरला घाबरतात आणि वार्ता मात्र तलवारीच्या करतात”

मुंबई | आम्ही कधीच हिंदुत्वाचं राजकारण करत नाही. देशात जिथे कुठे गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांना टोला लगावला.

संजय राऊत हे नेलकटरला घाबरतात आणि वार्ता मात्र तलवारीच्या करतात, असं म्हणत निलेश राणे यांनी राऊतांना टोला लगावला आहे. निलेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी स्मृतीस्थळावर गेले होते. यावेळी त्यांना माध्यमांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केलं.

दरम्यान, आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी, स्प्ष्ट करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू, आम्हाला तुमच्याकडून प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही कधीच हिंदुत्वाचं राजकारण करत नाही. देशात जिथे कुठे गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहिल, असं राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

भाजप नेते राम कदम यांना मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

काँग्रेस अध्यक्षपदासाठी डिसेंबरमध्ये होणार निवडणूक प्रक्रिया

पुढच्या लिलावात चेन्नईने महेंद्रसिंग धोनीला सोडून द्यावं; माजी खेळाडूचं मत

“महाराष्ट्र पोलिसांची माफी मागा अन्यथा तुमचे सर्व धंदे बाहेर काढू”

शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द नाही तर…- एकनाथ खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या