बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…नाहीतर ओवैसींना भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचं अंगवस्त्र म्हणून पाहिलं जाईल”

मुंबई | देशाचे संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला पाहिजे असे सांगण्याची हिंमत ओवैसींमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी ओवैसी यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जाईल, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

आज ओवैसींच्या सभांमधून ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे उठत आहेत. त्यामागेही राजकीय सूत्र आहेच. फोडा, झोडा आणि विजय मिळवा. ओवैसी यांनाही त्याच विजयाचे सूत्रधार म्हणून वापरलं जात आहे. पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपचं राजकारण पुढं सरकणार नाही का?, असा सवालही शिवसेनेनं अग्रलेखातून केला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत काय काय पाहावं लागेल, घडवलं जाईल ते सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाच्या यशस्वी वाटचालीचे पडद्यामागचे सूत्रधार मियाँ असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचा पक्ष चांगलाच कामाला लागल्याचं दिसत आहे, असं म्हणत शिवसेनेनं अग्रलेखातून ओवैसींवर सडकून टीका केलीये.

निवडणुकांचा हा असा लोकशाहीवादी खेळ सुरूच राहील. रायबरेलीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणा म्हणजे राष्ट्रभक्तांच्या छातीवर केलेले वार आहेत. ओवेसी व त्यांच्या एम.आय.एम. पक्षाचे नक्की ध्येयधोरण काय आहे? मुसलमानांवरील अन्यायाचा डंका पिटत हे महाशय देशभर फिरत आहेत. त्यांच्या राजकारणाचे प्रायोजकत्व कोणी वेगळेच लोक करत असावेत?, अशी टीका शिवसेनेनं केलीये.

थोडक्यात बातम्या- 

चिंताजनक! कोरोनामुळे कुपोषणाचा धोका वाढलाय, डाॅक्टरांचा गंभीर इशारा

“ममता बॅनर्जी मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय, अनेक राज्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास तयार”

“बारामती हा महाराष्ट्राचाच भाग आपण तो देखील जिंकू”

पुरंदरची खुमखुमी पुणे महापालिकेत काढू- विजय शिवतारे

“जेवणाच्या ताटावरुन उठवलं, आणखी कशावरुन उठवायचं सांगा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More