बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देऊन नेहरुंनी चूक केली होती- संजय राऊत

बेळगाव | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचारसभेत तुफान फटकेबाजी केली आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. तसेच काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देऊन नेहरुंनी चूक केली होती, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

पंडित नेहरू यांनी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देऊन चूक केली होती. ती चूक भाजपने दुरुस्त केली ना? मग आता पंतप्रधान मोदींनी बेळगावमध्ये येऊन ही चूकही दुरुस्त करावी, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुम्ही बेळगावात मराठी माणसाला पाडण्यासाठी भाजपच्यावतीने सभा घेणार आहात का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. उद्या बेळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराला आले तरी शुभम शेळके यांचा भरधाव घोडा थांबणार नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

आईची मुलापासून ताटातूट करण्यासाठी भाजप आणखी काय करणार? शुभमचा विजय हा संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना दिलेली भेट असेल. बेळगावची जनता साद घालेल तेव्हा महाराष्ट्र कायम पाठिशी उभा राहील, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी धडकी भरवणारी

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर किती वेळात कोरोना होतो?; समोर आली ही धक्कादायक माहिती

‘…तर पुण्यातील अत्यावश्यक दुकानंही बंद करा’; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीनं एका रात्रीत काढता, लाज वाटली पाहिजे”

“लोकांनी ऐकलं आहे, आता विरोधी पक्षानेही 1 मेपर्यंत घरीच बसावं”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More