बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा”

नवी दिल्ली | देशातील राजकारणी, पत्रकार आणि संपादक अशा 1500 हून अधिक लोकांचे फोन टॅप झाल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे परदेशी कंपन्या आणि अॅपने हे फोन टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका असून पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वत: त्यावर खुलासा केला पाहिजे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच या मुद्द्यावर संसदेत आवाज उठवणार असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध भाष्य केलं.

कोणीही ऐरागैरा येतो आणि आमचे फोन टॅप करतो. आमच्याकडे सायबर क्राईम संदर्भात कठोर नियम नाही, कायदे नाहीत. सरकारला ज्या पद्धतीने समोर येऊन या सर्व गोष्टींचा मुकाबला करायला हवा. ते दिसत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

फोन टॅपिंग झाल्याची काही नावं समोर आली आहेत. अजून बरीचशी नावं समोर यायची आहे. यावेळी पत्रकारांचे सर्वाधिक फोन टॅप झाले. संपादकांचेही फोन टॅप झाले. हे गंभीर आहे. गेल्या काही वर्षापासून पत्रकार, राजकारणी या देशात भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. आपल्यावर पाळत ठेवली जाते, आपले फोन टॅप केले जातात. ही सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यावर पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी समोर येऊन खुलासा करणं गरजेचं आहे, असं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“2017 ला मुंबई तुंबली तेव्हा मुख्यमंत्री जबाबदार होते अन् 2021 मध्ये पाऊस”

“कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत”

मुसळधार पावसात जखमी बाप-लेकीच्या मदतीला धावले पोलीस, पाहा व्हिडीओ

‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’; युवक काँग्रेसचं बोंबाबोंब आंदोलन

अमिताभ बच्चन की सोनू सूद?; फोटो पाहून चाहतेही पडले गोंधळात, पाहा फोटो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More