महाराष्ट्र मुंबई

राहुल गांधी हे फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील- संजय राऊत

मुंबई | राहुल गांधी हे फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि खादार संजय राऊत यांनी केलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

प्रत्येक घराण्याच्या नावाने पक्ष चालत असतो. गांधी आडनावाने जसा काँग्रेस पक्ष चालतो तसेच ठाकरे आडनावाने शिवसेना चालते. प्रत्येक घराणं हा त्या पक्षाचा चेहरा असतो, असं सांगतानाच गांधी कुटुंबाने देशाचं नेतृत्व करावं अशी जर जनतेची भावना असेल तर त्याचा सन्मान राखला पाहिजे. हीच खरी लोकशाही आहे, असं राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या ईडीकडून सुरू असलेल्या चौकश्यांवरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय वापर केला जात आहे. केवळ त्रास देण्यासाठीच या यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

थो़डक्यात बातम्या-

अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेची पोलिसांत तक्रार; पाहा काय आहे प्रकरण…

मुंबई उच्च न्यायालयाचा श्रीपाद छिंदमला दणका!

“लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटतं”

ट्रम्प समर्थकांकडून झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले…

ट्रम्प समर्थकांचा कॅपिटल भवनाबाहेर राडा, गोळीबारात महिलेचा मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या