महाराष्ट्र मुंबई

…त्यासाठी राज ठाकरेंना आम्ही नक्की मार्गदर्शन करू- संजय राऊत

File Photo

मुंबई | राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

आम्ही अनेकदा अयोध्येला गेलो आहोत. प्रत्येकानं तिथं जायला हवं. राज ठाकरे जात असतील तर चांगली गोष्ट आहे. अयोध्येची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन त्यांना हवं असेल तर ते द्यायची आमची तयारी आहे, असं संजय राऊत म्हणाले.

अयोध्येत मंदिर कुठं आहे. रामलल्ला कुठं आहेत. कोणकोणती मंदिरं आहेत. शरयूच्या काठावर कसं जायचं अशा गोष्टींचं आम्ही नक्की त्यांना मार्गदर्शन करू, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, मनसेची मुंबईत वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पण त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

थोडक्यात  बातम्या-

“आपल्या अहंकारासाठी केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार?”

सिंघू बॉर्डरवर स्थानिक-शेतकऱ्यांमध्ये दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार

“राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी आलो आणि अडकलो, बाहेरही पडता येईना “

अखेर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राज्यात ‘या’ तारखेपर्यंत लॉकडाऊन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या