Top News

…पण कुटुंब म्हणून आम्ही राज ठाकरेंच्या पाठिशी- संजय राऊत

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरेंची आज ईडी कडून चौकशी सुरू आहे. यावरच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात आम्ही सतत भांडत असतो. पण कुटुंब म्हणून आम्ही राज ठाकरेंच्या पाठीशी आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेबांचे संस्कार आहेत. आम्ही राजकारणात विरोधात असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत, असं संजय राऊत म्हणाले आहेत. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

इडीची नोटीस हे संकट नाही तर ही प्रोसेस आहे. मला वाटत नाही या चौकशीमधून काहीही बाहेर येईल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंना ईडीची नोटीस जरी आली असली तरी मला त्यातून काही निघेल असं वाटत नाही, असं उद्धव ठाकरेंनी देखील म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या