बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रातील पेटत्या मशालींचे चटके दिल्लीस बसताच 127 व्या घटनादुरुतीचं पाऊल पडलं”

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील पेटत्या मशालींचे चटके दिल्लीस बसताच 127 व्या घटनादुरुतीचं पाऊल पडलं! 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र विधानसभेने केलेला कायदाच घटनाबाह्य ठरवला. राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकारच नसल्याचे ठणकावले. त्यातून जो तिढा निर्माण झाला तो सोडविण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण यांना पंतप्रधानांकडे धाव घ्यावी लागली, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहात 127 व्या घटनादुरुस्तीचे विधेयक एकमताने मंजूर झालं. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून एकही दिवस गोंधळाशिवाय पार पडला नाही. त्याच वातावरणात ‘ओबीसी’ निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांकडे देणारे विधेयक आले. तेव्हा त्यावर शांततेत चर्चा घडून बहुमताने मंजुरीचे सोपस्कार पार पडले आहेत. आता मागासवर्ग कोण? कोणाला आरक्षण द्यायचं? याबाबतचे अधिकार राज्यांकडे आलेच आहेत, असंही राऊत म्हणालेत.

नवी घटनादुरुस्ती करून राज्यांना मागासवर्ग निश्चितीचे अधिकार द्यावे लागतील हे पहिले व आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून आणखी वर वाढवावी लागेल हे दुसरे! पण पहिली मागणी मान्य झाली व 50 टक्क्यांची मर्यादा तोडण्याबाबत केंद्राने लटकवून ठेवले. त्यामुळे ‘पेच’ काही सुटलेला नाही, असं ते म्हणाले.

महाराष्ट्रातील फक्त मराठा समाजालाच नव्हे तर देशभरातील जाट, गुर्जर, पटेल वगैरे अनेक समाजांच्या लोकांना या विधेयक मंजुरीचा फायदा मिळणार आहे, पण एक मात्र मान्य करावेच लागेल. महाराष्ट्रात मराठा समाजातील तरुणांनी आंदोलने करून क्रांतीची मशाल भडकवली नसती, तर काहीच घडले नसते, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

थो़डक्यात बातम्या-

‘खासदाराने माझा गळा आवळला’, मार्शलांचा गंभीर आरोप, पाहा व्हिडीओ

“मंत्री यशोमती ठाकूर यांनी 800 कोटींचा घोटाळा केला”

‘अगर आप करते रहेंगे हाऊस मे दंगा, तो कर देंगे एकदिन आपको नंगा’; आठवलेंचा विरोधकांना काव्यमय इशारा

के. एल राहुलचं दमदार शतक; तब्बल 31 वर्षांनी केला ‘हा’ विक्रम

नाशिकच्या लाचखोर फरार महिला शिक्षणाधिकारी यांची संपत्ती पाहुन तुम्हीही व्हाल थक्क!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More