बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे”

मुंबई | साकीनाका प्रकरणावरून भाजपसह सर्व विरोधीपक्षांनी सरकारवर सडकून टीका केली. राज्यात कायद्याचा धाक उरला नसल्याचं म्हणत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आता सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात असे कायद्याचेच राज्य आहे. विरोधकांनी साकीनाका बलात्कारप्रकरणी कितीही धुरळा उडवला तरी कायद्याच्या राज्यास तडा जाणार नाही. विरोधी पक्षनेते सांगतात, त्याप्रमाणे त्या नराधमाला फाशीची शिक्षा होईल. कोणत्या विषयाचं आणि प्रकरणाचं राजकारण करायचं याचं भान ठेवायलाच हवं, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

साकीनाकाप्रकरणी डोळ्यात अश्रू यावेत ही मनाची संवेदनशीलता आहे, पण नक्राश्रू ओघळू लागले की, भीती वाटतं, प्रकरणाचं गांभीर्य नष्ट होते, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

साकीनाक्याच्या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला असला तरी मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे, याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. अशा घटना एका भयानक विकृतीतून घडत असतात व जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ही विकृती उफाळून येऊ शकते, असंही अग्रलेखात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे”

“श्रेय स्वत:ला घ्यायचं आणि दोष दुसऱ्याला द्यायचा हाच मोदींचा मंत्र”

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही…’; महत्त्वाची माहिती समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं अक्षय कुमारला पत्र, म्हणाले…

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More