“उद्धव ठाकरे कुणाच्या दबावाला बळी पडत नाही, वेट अँन्ड वॉच”
मुंबई | वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे कुणाच्या दबावाला बळी पडत नाही. वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातील निर्णय घ्यायला मुख्यमंत्री सक्षम आहेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केली आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी याआधी सूचक ट्विट करत राठोड यांच्या राजीनाम्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांची एक फोटो ट्विट करत महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो?, असं सूचक ट्विट राऊत यांनी केलं होतं. यावरही राऊतांनी यावेळी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री कोणत्याही दबावाला बळी पडत नाहीत. माझी आणि मुख्यमंत्र्यांची दररोज चर्चा होते. मला त्यांना कशाचीही आठवण करुन देण्यासाठी ट्विटची गरज नाही. ते माझे मित्र, मार्गदर्शक आहेत. माझी त्यांची दररोज चर्चा होते. अगदी आजही सकाळी माझी आणि त्यांची चर्चा झाली, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
संजय राठोड यांच्यावरील निर्णय घ्यायला मुख्यमंत्री आहेत, तपास यंत्रणा आहे, पोलिस आहे, न्यायालय आहे. तुम्ही कशाला न्यायालयाच्या भूमिकेत जाताय. तसंच पुढे जाऊन वेट अँड वॉच, असं राऊत म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
“मृत्यूनंतर माझ्या अस्थी बिअरमधून पबबाहेरील नाल्यात विसर्जित करा”
संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार?; संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधाण
“नटाचा मृत्यू झाल्यावर खळबळ माजते पण सात वेळा खासदार झालेला माणूस जातो तेव्हा सगळे शांत”
लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी कायपण… ‘या’ भागात सुरु आहे अत्यंत धक्कादायक प्रकार
Comments are closed.