मुंबई | यूपीएच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव चर्चेत आलं आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता जर कुणामध्ये असेल तर ती शरद पवार यांच्यामध्ये आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. प्रश्नांची देशाची जाण, लोकांची नाडी, खंबीरपणा या सर्व गोष्टी शरद पवार यांच्याकडे आहे. तसेच त्यांचा अनुभव दांडगा आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत बोलायचं झालं तर, शिवसेना काही यूपीएची सदस्य नाही. त्यामुळे मी कस काय याबाबत मत व्यक्त करू?, असं संजय राऊत म्हणालेत.
महाराष्ट्रातील महाविकासआघाडीत आम्ही आहोत. पण अद्याप आम्ही यूपीएचे सदस्य नाही. त्यामुळे मी त्यावर मतप्रदर्शन करणार नाही. भविष्यात राजकारणात काय होईल. हे मी आत्ता सांगू शकत नाही, असं राऊत म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, नाही तर…- नाना पटोले
सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून दानवेंची पाठराखण, म्हणाले…
आम्हाला कोणताही ईगो नाही, चर्चेसाठी नवी तारीख सांगा- नरेंद्रसिंह तोमर
‘…तर आम्हीसुद्धा त्या ठिकाणी शांत राहणार नाही’; रोहित पवारांचा दानवेंना इशारा
“मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी राज्य सरकारवर टीका करणे दुर्दैवी”